वैष्णवीचं बाळ सुखरुप तिच्या माहेरी कसं पोहचलं? काकांनी सांगितला घटनाक्रम
पुण्यातील मुळशी येथील वैष्णवी हगवणे हिने हुंड्यासाठी झालेल्या छळामुळे गळफास घेऊन आत्महत्या केली. शशांक हगवणेशी तिचा प्रेमविवाह झाला होता, परंतु शशांक तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. वैष्णवीच्या कुटुंबीयांनी ही हत्या असल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी शशांक आणि त्याच्या बहिणीला अटक केली असून, सासरे आणि दीर फरार आहेत. वैष्णवीचे बाळ तिच्या कुटुंबाकडे सुखरूप पोहोचले आहे.