“शशांकरावांचं नाव घेते…”, वैष्णवी हगवणेने लग्नात घेतलेला उखाणा व्हायरल
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामुळे महाराष्ट्रात पुन्हा हुंडाबळीची चर्चा सुरू झाली आहे. ५१ तोळे सोनं, चांदी, रोख रक्कम दिल्यानंतरही तिचा सासरच्यांकडून छळ सुरू होता. तिच्या लग्नातील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात तिचं नवऱ्यावर असलेलं प्रेम दिसतं. तिचा उखाणाही व्हायरल झाला आहे. तिच्या दिर सुशील हगवणेची पोस्टही चर्चेत आहे, ज्यात सुनेबाबत लिहलं आहे.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 