पुण्याबाबत Apple च्या उपाध्यक्षांचे कौतुकोद्गार! शहरातील पहिल्या स्टोअरबाबत म्हणाल्या…
'पुणे तिथे काय उणे' म्हणीप्रमाणे Apple ने पुण्यात पहिलं रिटेल स्टोअर सुरू करण्याची घोषणा केली आहे. ४ सप्टेंबर रोजी कोरेगाव पार्क येथे १० हजार चौरस फूट आकाराचं हे स्टोअर उद्घाटन होणार आहे. कंपनीच्या सीनिअर व्हाईस प्रेसिडेंट देइरद्रे ओब्रायन यांनी पुण्याचं सांस्कृतिक आणि शैक्षणिक महत्त्व अधोरेखित केलं. Apple च्या तंत्रज्ञानप्रेमी भारतीय ग्राहकांसाठी उत्तम सेवा देण्याचा उद्देश आहे.