वीज, पतंग, ओला मांज्याचा ‘वाय-फाय, मोबाईल आणि टचस्क्रीन’च्या शोधाशी काय संबंध?
बेंजामिन फ्रँकलिन या धाडसी संशोधकाने १७५२ च्या उन्हाळ्यात एक विलक्षण प्रयोग केला. खरे तर हा अतिशय धोकादायक असा प्रयोग होता, कारण त्यात प्राण गमावण्याची शक्यता सर्वाधिक होती. त्याच्याही आधी काही संशोधकांनी असे प्रयत्न करून आपले प्राण गमावले होते… पण तरीही त्याने मात्र ‘हा प्रयोग करणारच’ असा पक्का निर्धारच केला होता. ढगांच्या गडगडाटात जेव्हा चमचमाट होऊन वीज कोसळते त्याचवेळेस, त्या वीजेच्या दिशेने एक पतंग उडवायचा आणि त्या पतंगाच्या ओल्या मांज्याला एक चावी अडकवायची असा हा प्रयोग होता.