“लवकरच येतेय…”, ‘आई कुठे काय करते’नंतर रुपाली भोसले झळकणार नवीन मालिकेतून?
'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले लवकरच एका नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे. रुपालीने तिच्या चाहत्यांना सांगितले की, "लवकरच काहीतरी भन्नाट घेऊन येतेय, मालिका की नाटक? सांगते लवकरच." यापूर्वी रुपालीने 'आई कुठे काय करते' मालिकेत संजना ही भूमिका साकारली होती.