“माझ्या आयुष्यातील नवदुर्गा…”, ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्याची अनिता दातेसाठी खास पोस्ट
देशभरात नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अभिनेता सुमंत ठाकरेने त्याच्या आयुष्यातील नवदुर्गांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. 'आई कुठे काय करते' मालिकेत अनिशची भूमिका साकारणाऱ्या सुमंतने अभिनेत्री अनिता दातेसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्यात त्याने अनिताच्या गुणांचे कौतुक केले आहे आणि तिच्या मैत्रीमुळे त्याला मिळालेल्या दृष्टिकोनाबद्दल आभार मानले आहेत.