वडिलांबरोबर प्रँक केला, पण घडलं उलटंच; ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा व्हिडीओ व्हायरल
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि पती अविनाश नारकर यांनी इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघे ऐश्वर्याच्या वडिलांसमोर डान्स करताना दिसतात. त्यांनी प्रँक करण्याचा प्रयत्न केला, पण ऐश्वर्याचे वडील डान्स एंजॉय करू लागले. व्हिडीओला "बाबा इज लव्ह" असे कॅप्शन दिले आहे. चाहत्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.