‘कौन बनेगा करोडपती १७’ प्रेक्षकांच्या भेटीला, अमिताभ बच्चन दिसले दुहेरी भूमिकेत
‘कौन बनेगा करोडपती’चा १७ वा सीझन ११ ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अमिताभ बच्चन यंदाही सूत्रसंचालन करत आहेत. या सीझनमध्ये सात कोटी रुपयांची बक्षीस रक्कम आहे. शोचे स्वरूप नेहमीप्रमाणेच असून स्पर्धकांना बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील आणि लाइफलाइन्सचा वापर करता येईल. शोच्या २५ व्या वर्षानिमित्त हा सीझन विशेष ठरणार आहे.