“काही जखमा कधीच भरून निघत नाही…”, अंकिता लोखंडेची वडिलांच्या आठवणीत भावुक पोस्ट; म्हणाली…
अंकिता लोखंडे हिंदी टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने नुकतीच तिच्या दिवंगत वडिलांच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. तिने तिच्या वडिलांसाठी लिहिलं की, "काही जखमा कधीच भरून निघत नाहीत, तुम्ही फक्त त्याबरोबर जगत असता." अंकिताचे वडील शशिकांत लोखंडे यांचं २०२३ मध्ये निधन झालं होतं. अंकिता सोशल मीडियावर सक्रिय असून, ती व तिचा नवरा विकी जैन अनेकदा फोटो व व्हिडीओ शेअर करतात. अभिनेत्रीने 'लाफ्टर शेफ' आणि 'स्वातंत्र्य वीर सावरकर' यांसारख्या कार्यक्रमांतही काम केलं आहे.