‘बालिका वधू’ फेम अभिनेत्री ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात, प्रेक्षकांनाही सहभागी होता येणार
'बालिका वधू' फेम अविका गौरने तिच्या साखरपुड्याची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. बॉयफ्रेंड मिलिंद चंदवानीसोबत ती लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 'पती, पत्नी और पंगा' या शोमध्ये त्यांनी त्यांच्या लग्नाबाबत सांगितलं आणि या शोद्वारेच त्यांच्या लग्नाचं थेट प्रसारण होणार आहे. अविकाने तिच्या चाहत्यांसोबत हा खास क्षण साजरा करण्याची इच्छा व्यक्त केली. दोघे ३० सप्टेंबर २०२५ रोजी विवाह करणार आहेत.