Bigg Boss 19 मधील ‘या’ स्पर्धकांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोण जाणार घराबाहेर?
टीव्हीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ला सात आठवडे पूर्ण झाले आहेत. या आठवड्यात अभिनेता झीशान कादरी घराबाहेर जाणार असल्याचं वृत्त आहे. नवीन नॉमिनेशन टास्कमध्ये मृदुल तिवारी, मालती चाहर, गौरव खन्ना व नीलम गिरी नॉमिनेट झाले आहेत. पाणीपुरी स्टॉल टास्कद्वारे नॉमिनेशन करण्यात आले. दिवाळीनिमित्त कोणतंही एव्हिक्शन टाळलं जाऊ शकतं, त्यामुळे प्रेक्षकांसाठी पुढील आठवडा मनोरंजक ठरणार आहे.