Bigg Boss 19 मध्ये सहभागी झालेला बसीर अली कोण आहे? याआधीही गाजवलेत अनेक रिअॅलिटी शो
'बिग बॉस १९' हा लोकप्रिय शो २४ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला आला. यंदाच्या पर्वात बसीर अली हा पहिला स्पर्धक आहे. बसीर अली हा २९ वर्षीय मॉडेल, अभिनेता व टीव्ही सेलिब्रिटी आहे. 'MTV रोडीज रायझिंग' आणि 'स्प्लिट्सव्हिला' जिंकून त्याने प्रसिद्धी मिळवली. 'कुंडली भाग्य' मालिकेतही त्याने काम केले आहे. 'बिग बॉस १९'मध्ये त्याची रणनीती कशी असेल, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.