अखेर वैर संपलं? ‘बिग बॉस’मधून बाहेर पडताच बसीरची प्रणीतबरोबरच्या ‘त्या’ वादावर प्रतिक्रिया
'बिग बॉस १९'मध्ये बसीर अली आणि प्रणीत मोरे यांच्यात वाद झाला होता. प्रणीतनं बसीरला घरातून आधी बाहेर जाण्याची धमकी दिली होती, ज्यावर बसीरनंही प्रत्युत्तर दिलं. बसीर घराबाहेर पडल्यावर प्रणीत भावूक झाला होता. बसीरनं सांगितलं की, त्यांची पैज कायम लक्षात राहील आणि तो माघार घेणार नाही. 'वीकेंड का वार'मध्ये बसीर आणि नेहल चुडासमा बाहेर पडले.