प्रणित मोरे-अमाल मलिक यांच्यात वाद, वादामुळे ‘बिग बॉस’चं घर तापलं; कारण काय?
'बिग बॉस १९' या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धकांमध्ये दररोज भांडणे होत आहेत. प्रणित मोरे आणि अमाल मलिक यांच्यात दुपारच्या जेवणावरून वाद झाला. अमालने उशीर होणार असल्याचं सांगितल्यावर प्रणितने त्याला उत्तर दिलं. यावरून दोघांमध्ये बाचाबाची झाली. या वादाचा प्रोमो समोर आला आहे. प्रेक्षकांना पुढील भागात या मैत्रीत फूट पडते का? हे पाहायला मिळेल.