ऑनलाइन गेमिंग बंदीच्या निर्णयावर धनंजय पोवारची प्रतिक्रिया, म्हणाला, “हे सरकार…”
सरकारने ऑनलाइन गेमिंगवर नियंत्रण आणण्यासाठी 'प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, २०२५' मंजूर केले आहे. या विधेयकाचा उद्देश ऑनलाइन मनी गेम्स आणि सट्टेबाजीवर बंदी घालणे आहे. 'बिग बॉस मराठी ५' फेम धनंजय पोवारने या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत "कष्ट करून पोट भरून खायचं" असे म्हणत सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे.