Video : ‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, व्हिडीओ व्हायरल
'बिग बॉस मराठी' फेम शिव ठाकरेच्या मुंबईतील घराला आग लागली आहे. सोशल मीडियावर या आगीचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ही घटना १८ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली असून अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र घराचे मोठे नुकसान झाले आहे. शिव ठाकरेने अद्याप या घटनेवर प्रतिक्रिया दिलेली नाही.