प्रसिद्ध अभिनेत्री करतेय गंभीर आजाराचा सामना, लिव्हर ट्रान्सप्लांटची आली वेळ; म्हणाली…
'बिग बॉस ओटीटी ३'ची विजेती सना मकबूल रुग्णालयात दाखल झाल्याचे फोटो समोर आले होते. तिला लिव्हर सिरोसिसचा गंभीर आजार झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने सांगितले की, ती ऑटोइम्यून हेपेटायटीसने ग्रस्त आहे आणि आता इम्युनोथेरपी सुरू केली आहे. सना यकृत प्रत्यारोपण टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. तिच्या आरोग्यामुळे तिने कामातून ब्रेक घेतला आहे. ८ जून रोजी सना तिच्या कुटुंबाबरोबर बकरी ईद साजरी करत होती, तेव्हा तिची तब्येत अचानक बिघडली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करावे लागले.