‘या’ स्पर्धकाकडून कच्चं राहिलं चिकन, ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून दाखवला बाहेरचा रस्ता
‘सोनी टीव्ही’ वाहिनीवरील लोकप्रिय ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’ कार्यक्रम दिवसेंदिवस रंजक होतं चालला आहे. ११ स्पर्धकांबरोबर सुरू झालेल्या या कार्यक्रमाचा प्रवास खूप मजेशीर होताना दिसत आहे. ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून सर्वात आधी कॉमेडियन चंदन प्रभाकर बाहेर झाला. त्यानंतर लोकप्रिय गायक, ‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा उपविजेता अभिजीत सावंत एविक्ट झाला. आता आणखीन एक स्पर्धक ‘सेलिब्रिटी मास्टरशेफ’मधून बाहेर झाला आहे. न शिजलेलं चिकन परीक्षकांना देणं या स्पर्धकाला महागात पडल्याचं समोर आलं आहे.