“मी ‘बिग बॉस’मध्ये कधीच जाणार नाही”, लोकप्रिय बॉलीवूड अभिनेत्रीचं स्पष्ट मत
बिग बॉस १९ लवकरच सुरू होणार असून, या शोमध्ये कोणते कलाकार सहभागी होणार याबद्दल चर्चा सुरू आहे. अभिनेत्री मल्लिका शेरावतच्या सहभागाबद्दल अफवा पसरल्या होत्या, परंतु तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट करून या अफवांना पूर्णविराम दिला आहे. तिने स्पष्ट केले की ती 'बिग बॉस'मध्ये सहभागी होणार नाही. यापूर्वी डेजी शहा, राम कपूर आणि गौरव तनेजाही शोमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.