तुझ्या पदरा बांधली माझ्या शेल्याची गाठ…; कुशलची पत्नी सुनयनासाठी हृदयस्पर्शी कविता
'चला हवा येऊ द्या' फेम कुशल बद्रिकेने आपल्या अभिनय कौशल्याने सर्वांचं मनोरंजन केलं आहे. तो उत्तम अभिनेता, लेखक आणि कवी आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कुशलचा मोठा चाहतावर्ग आहे. कुशलने आपल्या पत्नीसाठी 'आम्ही सारे खवय्ये'च्या दुसऱ्या सीझनमध्ये एक खास कविता सादर केली आहे. या कवितेने चाहत्यांची मनं जिंकली असून अनेकांनी त्याचं कौतुक केलं आहे.