वाहतूक कोंडीत अडकलेल्या श्रेया बुगडेने व्यक्त केला संताप; म्हणाली, “५ तासांपासून…”
मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. अभिनेत्री श्रेया बुगडेने या समस्येबद्दल सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. पाच तास वाहतूक कोंडीत अडकल्याने तिने रस्त्यांवर खाद्यपदार्थांचे स्टॉल, खरेदीसाठी छोटी दुकानं, पुस्तकविक्रीचे स्टॉल आणि सार्वजनिक शौचालयांची सोय करण्याची मागणी केली आहे. श्रेया सध्या 'चला हवा येऊ द्या' शोच्या दुसऱ्या सीझनमध्ये काम करत आहे.