“तुझी मुलगी असल्याचा अभिमान…”, श्रेया बुगडेची आईच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट; म्हणाली…
अभिनेत्री श्रेया बुगडे सध्या 'चला हवा येऊ द्या'च्या नवीन पर्वात प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. श्रेया सोशल मीडियावरही सक्रिय असून, तिनं नुकतीच तिच्या आईसाठी खास पोस्ट केली आहे. आई नूतन बुगडे यांच्या वाढदिवसानिमित्त श्रेयाने आईबरोबरचे फोटो पोस्ट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. श्रेयाने आईच्या संघर्ष, प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. अनेक कलाकारांनीही या पोस्टवर शुभेच्छा दिल्या आहेत.