संजू राठोडच्या ट्रेंडिंग गाण्यावर नायिकांचा हटके डान्स, ‘शेकी शेकी’वर थिरकल्या अभिनेत्री
मराठीतील प्रसिद्ध गायक संजू राठोडचं 'एक नंबर, तुझी कंबर… हाय चाल शेकी शेकी' हे गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय ठरत आहे. यूट्यूब आणि इन्स्टाग्रामवर लाखो व्ह्यूज मिळवत आहे. 'इंद्रायणी' मालिकेतील अभिनेत्री कांची शिंदे, समृद्धी दांडगे, सायली देशमुख आणि अपूर्वा चौधरी यांनी या गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. इंदूच्या लग्नानंतर त्यांनी हा व्हिडीओ आनंदात शेअर केला आहे.