“उत्सव साजरे करण्यापेक्षा मिरवण्याकडे कल…”, मराठी अभिनेत्याने मांडलं स्पष्ट मत; म्हणाला…
राज्यात गणेशोत्सव सुरू झाला असून, घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान झाले आहेत. मराठी अभिनेता उदय नेनेने मुंबईतील गणेशोत्सवाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, उत्सव साजरे व्हायला हवेत, पण त्याचं अक्राळविक्राळ स्वरूप नको. मुंबईत उत्सव साजरे करण्यापेक्षा मिरवण्याकडे कल आहे. सार्वजनिक गणेशोत्सव एकाच ठिकाणी असावा, मोठ्या मूर्तींची गरज नाही. सण साजरे करताना लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.