मंदार-गिरिजाने पाण्यातून वाट काढत गाठला सेट; व्हिडीओद्वारे दाखवली पावसाची परिस्थिती
गेल्या तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पावसामुळे रस्ते वाहतूक आणि लोकल ट्रेनसेवा प्रभावित झाली आहे. मनोरंजनसृष्टीतील कलाकार मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू यांनी गुडघाभर पाण्यातून वाट काढत सेट गाठला आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत 'शो मस्ट गो ऑन' असा संदेश दिला आहे. त्यांच्या या कृतीचं चाहत्यांनी कौतुक केलं आहे.