“स्वयंपाकाशी तिचा संबंध नाही…”, हिना खानच्या सासुबाईंनी सूनेबद्दल केली तक्रार
हिना खान हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री असून सध्या 'पती पत्नी और पंगा' या कार्यक्रमात झळकत आहे. या कार्यक्रमाच्या नवीन प्रोमोमध्ये हिनाच्या सासुबाई लता जैस्वाल यांनी तिच्या स्वयंपाक कौशल्यावर गंमतीशीर तक्रार केली आहे. हिनाच्या सासुबाईंच्या या मजेशीर तक्रारीमुळे सर्वजण हसले. हिनानेही या प्रोमोवर कमेंट करत आपल्या सासुबाईंचं कौतुक केलं आहे. 'पती पत्नी और पंगा' हा कार्यक्रम शनिवार व रविवार रात्री ९:३० वाजता प्रसारित होतो.