नवरा असावा तर असा! हिना खानची रॉकी जैस्वाल ‘अशी’ घेतोय काळजी, अभिनेत्री कौतुक करत म्हणाली…
प्रसिद्ध अभिनेत्री हिना खान सध्या कर्करोगाशी धैर्याने सामना करत आहे. यात तिचा नवरा रॉकी जैस्वाल तिची खंबीरपणे साथ देत आहे. नुकतेच या दोघांचे साधेपणाने लग्न झाले. हिनाने सोशल मीडियावर रॉकीचा तिच्या पायांची मालिश करतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि तिने त्याच्यासाठी कौतुकास्पद पोस्टही शेअर केली आहे. दरम्यान, हिना आणि रॉकी २०१२ पासून एकत्र आहेत.