“गेली १२ वर्षे…”, देवदत्त नागे यांनी सांगितली ‘जय मल्हार’ मालिकेदरम्यानची ‘ती’ आठवण
मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेते देवदत्त नागे यांनी 'जय मल्हार' मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नवीन घराच्या कामाची माहिती दिली. जेजुरीमध्ये घर बांधण्याची त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यांनी श्री खंडेरायांच्या आशीर्वादाने हे घर उभारले आहे आणि त्या पवित्र जागेचं ब्रँडिंगही तेच हाताळत आहेत.