‘कोण होतीस तू, काय झालीस तू’मधील ‘ही’ लोकप्रिय अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अकडणार
स्टार प्रवाहवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ मालिकेत यश-अमृता आणि कावेरी-उदय यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. मालिकेतील विद्या म्हणजेच अभिनेत्री साक्षी महाजन पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं. तिची सहकलाकार साक्षी गांधीनेही याला दुजोरा दिला. साक्षी महाजनने लग्नाच्या तयारीबद्दल उत्सुकता व्यक्त केली आहे. मालिकेत विरोधात असलेल्या साक्षी गांधी आणि साक्षी महाजन प्रत्यक्षात घनिष्ठ मैत्रीणी आहेत.