माझं तुझ्यावर प्रेम आहे! अखेर यशने कावेरीला केलं प्रपोज, पण नियतीच्या मनात काही वेगळंच…;
स्टार प्रवाहवरील 'कोण होतीस तू काय झालीस तू' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. यश (मंदार जाधव) आणि कावेरी (गिरिजा प्रभू) यांची जोडी लोकप्रिय आहे. मालिकेत रेवती लेलेची एन्ट्री झाली असून ती यशच्या बालमैत्रीणीची भूमिका साकारत आहे. यश कावेरीला प्रेम व्यक्त करण्याच्या तयारीत असताना, माईंनी यश-अमृताच्या लग्नाची घोषणा केली आहे. त्यामुळे मालिकेत लव्ह ट्रँगल पाहायला मिळणार आहे.