‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’मध्ये बिल गेट्स यांची एन्ट्री; स्मृती इराणींसह दिसणार
‘क्योंकि सास भी कभी बहू थी २’ या लोकप्रिय मालिकेत उद्योगपती बिल गेट्स यांची व्हर्च्युअल एन्ट्री होणार आहे. स्मृती इराणी (तुलसी) आणि बिल गेट्स यांच्यात व्हिडीओ कॉलद्वारे संवाद होईल. हा ट्रॅक तीन भागांमध्ये दाखवला जाईल. बिल गेट्स यांचा हा एपिसोड आरोग्य जागरूकतेचा संदेश देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मालिकेचे हे विशेष भाग २४ आणि २५ ऑक्टोबरला प्रसारित होतील.