‘क्योंकि सास…’च्या नव्या पर्वासाठी सर्व कलाकार आले एकत्र; २५ वर्षांपूर्वी झालेली भेट
'क्योंकि सास भी कभी बहू थी' ही लोकप्रिय हिंदी मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेच्या दुसऱ्या पर्वासाठी पहिल्या पर्वातील सर्व कलाकार एकत्र आले आहेत. तुलसी आणि मिहिर ही जोडी पुन्हा प्रेक्षकांसमोर येणार आहे. २९ जुलै रोजी मालिकेचं दुसरं पर्व सुरू होणार आहे. 'स्टार प्लस'ने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून ही माहिती दिली आहे.