‘लग्नानंतर होईलच प्रेम’ मधील आर्किटेक पार्थ देशमुखचं खऱ्या आयुष्यात शिक्षण किती?
विजय आंदळकर, 'लग्नानंतर होईलच प्रेम' मालिकेत पार्थ देशमुखची भूमिका साकारत आहे. खऱ्या आयुष्यात विजय वकील असून त्याने वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी त्याने स्पर्धा परीक्षाही दिल्या होत्या. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर तीन वर्षे वकिलीचं शिक्षण घेतलं. नंतर 'ढोल ताशा' सिनेमातून त्याचा अभिनय प्रवास सुरू झाला.