“दादागिरी नाही पण…”,अक्षया देवधर हर्षदा खानविलकर यांच्याबद्दल असं का म्हणाली?
'लक्ष्मी निवास' ही मराठीतील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेत हर्षदा खानविलकर मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेतील कलाकार अक्षया देवधर व कुणाल शुक्ला यांनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत हर्षदा यांच्याबद्दल सांगितले. अक्षयाने हर्षदाला "बॉस लेडी" म्हटले, तर कुणालने त्यांच्या शांतपणे बोलण्याच्या शैलीचा उल्लेख केला. मालिकेत भावना व सिद्धू यांच्या जोडीला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.