शाहरुख खानच्या गाजलेल्या गाण्यावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमातील अभिनेत्री शिवाली परबने तिच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. शिवाली सोशल मीडियावर सक्रिय असून, तिने शाहरुख खान आणि ट्विंकल खन्ना यांच्या 'मोहब्बत हो गई' गाण्यावर डान्स व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांसह कलाकारांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शिवालीच्या डान्समधील नव्या शैलीचं कौतुक होत आहे.