गौरव मोरेसह ‘हास्यजत्रा’मधील ‘या’ कलाकारानेही ‘चला हवा येऊ द्या’मध्ये केलीय एन्ट्री
झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या'चा नवा पर्व नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या पर्वात कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, प्रियदर्शन जाधव आणि गौरव मोरे आहेत. गौरव मोरेसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधील निमिशन कुलकर्णीसुद्धा आता 'चला हवा येऊ द्या'मध्ये सहभागी झाला आहे. या शोमध्ये तो दिग्दर्शकीय टीममध्ये आहे. नुकत्याच एका मुलाखतीत दिग्दर्शनातील पदार्पणाबद्दल त्याने भावना व्यक्त केल्या.