याला म्हणतात खरा कोकणी! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने गणपतीसाठी केली गायनसेवा
गणेशोत्सवाच्या निमित्ताने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता प्रसाद खांडेकरने कोकणात आपल्या गावी जाऊन गणपतीच्या भजनात सहभाग घेतला. त्याने गळ्यात टाळ अडकवून भजन गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. प्रसादने या व्हिडीओला "गणपतीमधलं गावचं भजन म्हटलं की, एकदम काळजाला हात घालणारा विषय" अशी कॅप्शन दिली आहे.