“लाज नाही वाटत का?” घोडबंदर रस्त्याची दुर्दशा पाहून मराठी अभिनेत्याचा संताप; म्हणाला…
मुंबईतील रस्त्यांची दुरवस्था हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. ठाणे-घोडबंदर रोडवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. मराठी अभिनेता आस्ताद काळेने या रस्त्यावरील खड्ड्यांचा व्हिडीओ शेअर करून नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना जाब विचारला आहे. त्याने रस्त्यांच्या दुरवस्थेवर टीका केली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे.