“मला ते आवडलं नाही”, KBC मधल्या इशितबद्दल पुष्कर क्षोत्रीची स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाला…
काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये इशित भट्ट नावाचा मुलगा चर्चेत आला होता. त्याच्या उद्धट वागण्यामुळे सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ व्हायरल झाले. अभिनेता पुष्कर क्षोत्रीने यावर प्रतिक्रिया देत आई-वडिलांनी मुलांच्या वागणुकीवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. मुलांच्या चुकांवर पांघरूण न घालता त्यांना योग्य समज देणे आवश्यक आहे, असेही पुष्करने म्हटले.
 
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
  
 