नांदणीच्या महादेवी हत्तीणीसाठी सरसावले मराठी कलाकार, लोकप्रिय अभिनेत्याने पोस्ट करत म्हणाला, “माधूरी परत येत नाही तोवर…”
गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर महादेवी हत्तीणीला निरोप देतानाचे व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. ३५ वर्षे नांदणी गावात राहिलेली महादेवी सोमवारी गुजरातच्या वनतारामध्ये रवाना झाली. गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते. मराठी कलाकारांनीही महादेवीसाठी पोस्ट शेअर केल्या आहेत. स्वप्नील राजशेखर यांनी महादेवीच्या विरहाबद्दल भावना व्यक्त करत पेटाच्या निर्णयावर टीका केली आहे. ग्रामस्थ महादेवीला परत आणण्याची मागणी करत आहेत.