“गरीबांचे स्टॉल बंद पाडू नका”, मराठी अभिनेत्रीची संतप्त पोस्ट; म्हणाली, “हिंमत असेल तर…”
सिगारेटच्या पाकिटावर "सिगारेट ओढणं आरोग्यासाठी घातक आहे" असा इशारा असतो. तसंच आता समोसे, जलेबीबाबत आरोग्यविषयक इशारा देणारे फलकही लावण्यात येणार आहेत. भारतातील वाढत्या लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोगांच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. अभिनेत्री आरती सोळंकीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून पिझ्झा, बर्गर यांसारख्या पदार्थांवरही बंदी आणण्याची मागणी केली आहे.