“मतदार गेले खड्ड्यात…”, घोडबंदर रोडवरील खड्ड्यांबद्दल लोकप्रिय अभिनेत्रीचा संताप
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीबद्दल मराठी अभिनेत्री सुरभी भावेने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत प्रशासनावर टीका केली आहे. सुरभीने मंत्री, आमदार, खासदारांना सामान्य नागरिकांसारखा प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. ती म्हणते, "घोडबंदर रोडवर कायम ट्रॅफिक असते, ज्यामुळे प्रवासाचा वेळ आणि नागरिकांची त्रास वाढतो." सुरभी सध्या "तू ही रे माझा मितवा" मालिकेत काम करत आहे.