लोकप्रिय गायकाने लहानग्या चाहत्याची ‘ती’ इच्छा केली पूर्ण, चाहत्यांनीही केलं कौतुक; पाहा गोड व्हिडीओ
कलाकार आणि चाहत्यांचं नातं अतूट असतं. गायक-अभिनेता उत्कर्ष शिंदेला भेटून एका लहान चाहत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. उत्कर्षने हा खास क्षण सोशल मीडियावर शेअर केला आहे. लहान चाहत्याच्या हट्टामुळे उत्कर्षने त्याच्याबरोबर गाणं गायलं. उत्कर्षने सांगितलं की, कला जोपासताना मन जिंकलं की माणसंही जिंकता येतात. या व्हिडिओखाली अनेकांनी उत्कर्षच्या कृतीचं कौतुक केलं आहे.