मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसावले मराठी कलाकार; लोकप्रिय अभिनेता म्हणाला…
महाराष्ट्रातील मराठवाडा आणि इतर जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य शासन आणि काही संस्था मदतीसाठी पुढे आल्या आहेत. मराठी अभिनेता सौरभ चौघुले आणि इतर कलाकारांनीही मदत जाहीर केली आहे. सौरभने सोशल मीडियावर व्हिडीओद्वारे मदतीचं आवाहन केलं आहे. कल्याणमधील अत्रे मंदिर येथे जीवनावश्यक वस्तू दान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.