“तिने २२ वर्षं खूप सहन केलं…”, मुनव्वर फारुकीने सांगितलं आईच्या निधनाचं धक्कादायक सत्य
'बिग बॉस' फेम मुनव्वर फारुकी सध्या 'पती पत्नी और पंगा' या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. त्यानं त्याच्या आईच्या दुर्दैवी निधनाबद्दल सांगितलं आहे. आईच्या मृत्यूनंतर त्याच्या वडिलांबद्दल तिरस्कार निर्माण झाला होता. आईच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी त्याला कामाला लावलं. वडिलांना पॅरालिसीस झाल्यानंतर मुनव्वरनं त्यांना माफ केलं आणि त्यांच्याबद्दलचा राग कमी झाला.