“हे सगळंच स्वप्नवत…”, ‘नशीबवान’ फेम नेहा नाईकची प्रतिक्रिया; आदिनाथ कोठारेबद्दल म्हणाली…
'नशीबवान' मालिकेत नेहा नाईक मुख्य नायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे, तर आदिनाथ कोठारे मुख्य नायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. नेहाने आदिनाथबरोबर काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. ती म्हणाली, "आदिनाथ खूप सांभाळून घेतो आणि त्याच्याकडून खूप शिकायला मिळतं. पहिल्या दिवशीच त्याने माझं दडपण घालवलं आणि मनमोकळेपणाने सीन करायला प्रोत्साहित केलं."