ब्रेकअपच्या दोन वर्षांनी पवित्रा पुनिया पुन्हा प्रेमात, साखरपुड्याचे फोटो केले शेअर
अभिनेत्री पवित्रा पुनिया आणि अभिनेता एजाज खान यांचे नाते ब्रेकअपनंतर पवित्रा पुन्हा प्रेमात पडली आहे. तिने एका व्यावसायिकासोबत साखरपुडा केला आहे. पवित्राने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात तिचा प्रियकर तिला अंगठी देताना दिसतो. पवित्राने तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव उघड केलेले नाही. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने नव्या नात्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.