सुदेश म्हशीलकरांनंतर प्राची पिसाटला अभिनेत्याचे मेसेज, अभिनेत्रीने शेअर केले स्क्रीनशॉट
लोकप्रिय मराठी अभिनेत्री प्राची पिसाटने मराठी अभिनेते सुदेश म्हशीलकरांनी तिला केलेल्या आक्षेपार्ह मेसेजचे स्क्रीनशॉर्ट शेअर केले होते. यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली. सुदेश म्हशीलकरांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. यानंतर आता संगीतकार, अभिनेते राहुल रानडे यांनीही प्राचीला मेसेज केले, ज्यावर प्राचीनं त्यांना कडक उत्तर दिलं. प्राचीनं स्पष्ट केलं की, कोणत्याही मुलीने वेळ, वय आणि परिस्थिती बघून गैरवर्तन सहन करण्याचा ठेका घेतलेला नाही.