प्रणित मोरेने अजय देवगणवरही केला आहे जोक, डान्सबद्दल खोचक टीका करत म्हणालेला…; पाहा Video
'बिग बॉस १९'मधील स्पर्धक प्रणित मोरे हा स्टँडअप कॉमेडियन आहे. त्याने अजय देवगणवर जोक केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अजयने 'बिग बॉस'मध्ये त्याला जोकबद्दल विचारले असता, प्रणितने नकार दिला होता. प्रणित नुकताच प्रकृतीच्या कारणांमुळे शोमधून बाहेर पडला होता, पण आता परतला आहे. त्याने अभिषेक बजाजला नॉमिनेशनमध्ये बाहेर काढल्यामुळे टीकेचा सामना करावा लागत आहे.