अभिषेकला घराबाहेर काढल्याच्या निर्णयामुळे प्रणितवर टीका; टीमनं स्पष्टीकरण देत म्हटलं…
'बिग बॉस १९'च्या ८० दिवसांच्या प्रवासात अनेक ट्विस्ट आले. नीलम गिरी व अभिषेक बजाज यांच्या एलिमिनेशनमुळे प्रेक्षक आणि स्पर्धक धक्क्यात आहेत. प्रणित मोरेला अशनूर, नीलम व अभिषेक यांच्यातून एकाला वाचवायचं होतं. त्याच्या निर्णयावर टीका झाली, पण त्याच्या टीमने स्पष्टीकरण दिलं की प्रणितने मनापासून खेळ केला. 'बिग बॉस १९'चा महाअंतिम सोहळा ७ डिसेंबरला होणार आहे.